आजचा सुविचार

खोटे बोलणे ही भित्रेपणाची निश्चित खूण आहे.


आजची बोधकथा


एका जंगलात एके दिवशी एक पारधी शिकारीसाठी आला. त्याला पाहून जंगलातील प्राणी घाबरून सैरावैरा पळू लागले. एका सिंहाने ते पाहिले,तो पळणाऱ्या प्राण्यांना म्हणाला, "अरे माझ्यासारखा शक्तिमान प्राणी तुमचा राजा असताना तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही."सिंह असे बोलतो न बोलतो तोच सूं सूं करत एक बाण आला व सिंहाच्या पंजात घुसला. सिंह तसाच विव्हळला. तीन
पायावर पळत सुटला, एका कोल्ह्याने पाहिले व म्हणाला, "वनराज आताच तर आपण शौर्याच्या,शक्तीच्या गप्पा मारत होतामग आता
का घाबरून पळता आहात.यावर सिंह कोल्ह्याला म्हणालाअरे बाबामी शक्तीने सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असलो तरी माणूस हा प्राणी बुध्दीने सामर्थ्यशाली आहे त्याची बरोबरी करणारा दुसरा प्राणी नाही.'



तात्पर्य :


बुध्दीच्या सामर्थ्यापुढे शारीरिक सामर्थ्य कमी पडते.

TODAYS THOUGHT


Imagination is the ruler of our dreams.


TODAYS MORAL STORY


THE WOLF IN SHEEP’S CLOTHING

   
   
One day a wolf found a sheepskin. He covered himself with
the sheepskin and got into a flock of sheep grazing in a field. He thought, “The shepherd will shut the sheep in the pen after sunset. At night I will run away with a fat sheep and eat it. All went well till the shepherd shut the sheep in the pen and left. The wolf waited patiently for the night to advance and grow
darker. But then an unexpected thing happened. One of the servants of the shepherd entered the pen. His master had sent him to bring a fat sheep for supper. As luck would have it, the servant picked up the wolf dressed in the sheepskin. That night the shepherd and his guests had the wolf for supper.




MORAL


An evil design has an evil end.

आजचा सुविचार

दु:खामुळे मन हळवे होते.


आजची बोधकथा


एकदा एक राजा जंगला मध्ये शिकारीला गेला. तेथे तो खूप दमला, त्याला पिण्यास पाणी हवे होते. तो शोधत शोधत एका झोपडीपाशी गेला. तेथे त्या राजाला तेथील माणसाने विचारपूस केली, खायला दिले व पिण्यास पाणी दिले. त्याच्या ह्या आदरातिथ्याने राजा भारावून गेला व
त्याने त्या माणसाला खुश होवून त्या जंगलाचा एक विशिष्ट परिसर भेट देवून टाकला. पण ज्याला हे भेट मिळाले त्याला त्या गोष्टीची जाणीव नव्हती किंबहुना तो मूर्ख होता असेच म्हणा की कारण ते जंगल चंदनाचे होते. ह्या माणसाला ते जंगल भेट मिळाल्यावर त्याने तेथील एक एक झाड तोडावयास सुरुवात केली व त्याचा कोळसा बनवून विकण्याचा उद्योग सुरु केला. त्यातून त्याला त्याच्या उदरनिर्वाह पुरते धन मिळू लागले. असे करत करत त्याला भेट मिळालेल्या भागातील २-3 झाडे शिल्लक राहिली. काही काळाने पावसाळा सुरु झाला. पावसाच्या मुळे त्याला झाडे तोडली तरी त्याचा कोळसा बनविता येईना, मग त्याने तशीच लाकडे घेवून बाजाराचे ठिकाण गाठले, तेथे येणाऱ्या हुशार व्यापा-यांनी त्याच्याकडील चंदनाची लाकडे ओळखली व त्याला धन दिले. त्या मूर्ख माणसाला हेच कळेना कि मी ह्याच लाकडाचा कोळसा विकत होतो मला कमी पैसे मिळत होते पण आता मी लाकडे आणली तर इतके का पैसे मिळत आहेत. त्याने
त्याचे कारण विचारले त्या वेळेला व्यापा-यांनी त्याला सांगितले '' अरे वेड्या ! चंदन आणि त्याचा कोळसा ह्यात काही तरी फरक आहे कि नाही. तुला जर हे कळत असते तर तू आता आम्हालाही विकत घेतले असते इतका श्रीमंत झाला असता. '' शेवटी त्या मूर्ख माणसाला चंदनाचे जंगले भेट मिळूनही त्याचा लाभ घेता आला नाही.


तात्पर्य :


मिळालेल्या संधीचा ज्याला फायदा करून घेता येतो तोच शहाणा ठरतो.

TODAYS THOUGHT


The Greatest Friend Of Truth is Time.


TODAYS MORAL STORY


THE BOY WHO CRIED 'WOLF'


   


       Once there was a shepherd boy who had to look after a flock of sheep.One day,he felt bored and decided to play a trick on the villagers.He shouted,“Help! Wolf! Wolf!” The villagers heard his cries and rushed out of the village to help the shepherd boy.When they reached him,they asked,
“Where is the wolf?” The shepherd boy laughed loudly, “Ha, Ha, Ha! I fooled all of you.I was only playing a trick on you.”
     A few days later, the shepherd boy played this trick again.Again he cried, “Help! Help! Wolf! Wolf!” Again, the villagers rushed up the hill to help him and again they found that boy had tricked them. They were very angry with him for being so naughty. 
     Then, some time later, a wolf went into the field. The wolf attacked one sheep, and then another and another. The shepherd boy ran towards the village shouting, “Help! Help! Wolf! Help! Somebody!” The villagers heard his cries but they laughed because they thought it was another trick. The boy ran to the nearest villager and said, “A wolf is attacking the sheep. I lied before, but this time it is true!” Finally, the villagers went to look. It was true. They could see the wolf running away and many dead sheep lying on the grass.




MORAL


We may not believe someone who often tells lies, even when he tells the truth.

भारताचा राष्ट्रध्वज







भारतीय राष्ट्रध्वज २२ जुलै १९४७ रोजी, भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या २४ दिवस आधी, अंगिकारला गेला. भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवापांढरा व हिरवा ह्या तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत ज्यामुळे त्याला पुष्कळदा तिरंगा असेही संबोधले जाते. मछलीपट्टणम जवळ जन्मलेल्या पिंगली वेंकय्या ह्यांनी तिरंग्याची रचना केली आहे.
भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे, तसेच राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे.

रचना


पिंगली वेंकय्या ह्यांनी रचलेल्या भारतीय राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा हे तीन रंग आहेत. पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मधोमध निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे.
रंगभावना
गडद भगवात्याग
पांढराशांती
हिरवासमृद्धी
निळाचोविस तास

भारताचा राष्ट्रीय ध्वजात चार रंगाचा वापर केला गेला आहे. केशरी,पांढरा,हिरवा,आणि निळा.(खरे पाहता आपला राष्ट्रीय राष्ट्रीय ध्वज, रंगाचाच विचार केला तर तिरंगा नसून चौरंगा आहे).
२२ जुलै १९४७ रोजी घटना समितीच्या बैठकीत 'तिरंगी ध्वज' भारताचा अधिकृत राष्ट्रीजय ध्वज म्हणून स्वीकृत करण्या त आला.
त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरी, मध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवा, अशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे धम्मचक्र असून ते सारनाथ येथे आढळलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे हे. चक्राला २४ आरे आहेत. डॉ. एस्. राधाकृष्णन्यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे
ध्वजात तीन समान आडव्या पट्ट्यांची रचना करण्याकत आली आहे.
- वरच्या भागात गडद केशरी रंग आहे.या रंगातून त्याग, धैर्य याचा बोध होतो.
- मधल्या भागात पांढरा रंग आहे.या रंगातून प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा शांती, सत्य, व पावित्र्याचा बोध होतो.

- खालील भागात गडद हिरवा रंग आहे. हा रंगातून निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो, निष्ठा व समृध्दीचा बोध होतो.


- निळ्या रंगाचे अशोक चक्र हे सागराप्रमाणे अथांगता व कालचक्राच व त्यासोबत बदलत जाणा-या जगाचं सूचन करतो.जीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्णतेने आगेकूच करावी असे धम्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धम्मचक्र आहे. त्याला‘अशोकचक्र' या नावाने ओळखले जाते.त्यात भारतीय कला, तत्त्वज्ञान, इतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. ‘धम्मचक्र प्रवर्तनाय' हे घोषवाक्य भारतीय संसदसभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे



राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
  • राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते. संहितेनुसार महत्त्वाचे राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.
  • ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे. राष्ट्रीय ध्वज अशा जागेवर फडकवला पाहिजे की, तो सगळ्यांना दिसला पाहिजे. शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रथा आहे. रविवार व अन्य सुटीच्या दिवशीही सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत ध्वज फडकवला गेलाच पाहिजे. प्रतिकूल हवामानातही ध्वज फडकवणे आवश्यक आहे.
  • संहितेनुसार राष्ट्रध्वज नेहमी स्फूर्तीने फडकवला पाहिजे व आदरपूर्वक ध्वज हळूहळू उतरवला गेला पाहिजे. ध्वज फडकवताना व उतरवताना बिगूल वाजविलाच पाहिजे. ध्वज कुठल्याही इमारतीच्या खिडकी, बाल्कनी अथवा दर्शनी भागात आडवा व तिरपा फडकवताना ध्वजातील केशरी रंगांचा पट्टा हा वरच्या बाजूला हवा.
  • राष्ट्रध्वज सभेच्या वेळी फडकविताना अशा पद्धतीने फडकाविला गेला पाहिजे की, मान्यवराचे तोंड हे उपस्थिताकडे पाहिजे व ध्वज हा त्यांच्या डाव्या बाजूला पाहिजे. अथवा ध्वज भिंतीवर असेल तर मान्यवरांच्या मागे व भिंतीवर आडवा फडकाविला पाहिजे. कुठल्या पुतळ्याचे अनावरण असेल तर ध्वज सन्मानपूर्वक व वेगळ्या पद्धतीने फडकविला गेला पाहिजे. ध्वज गाडीवर लावताना गाडीच्या बॉनेटवर एक दंड उभा करावा व त्यावर फडकवावा.
  • संहितेनुसार राष्ट्रीय ध्वज कुठल्या मिरवणूक किंवा परेडच्या व्यक्तीच्या उजव्या हातात ध्वज असावा. जर इतरही ध्वज असतील तर त्यांच्या मध्यभागी राष्ट्रध्वज असला पाहिजे. फाटलेला, मळलेला ध्वज फडकविला जाता कामा नये. कोणत्या व्यक्तीला अथवा वस्तूला वंदन करताना ध्वज जमिनीच्या दिशेने झुकवू नये. इतर ध्वजांची पताका अथवा ध्वज राष्ट्रध्वजापेक्षा उंच लावू नये.
  • राष्ट्रध्वजाचा उपयोग वक्त्याचे व्यासपीठ झाकण्यासाठी अथवा ते सजविण्यासाठी करू नये. केशरी पट्टा जमिनीच्या बाजूने ठेवून ध्वज फडकविला जाऊ नये. तसेच राष्ट्रध्वजाला माती व पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये. ध्वज फडकविताना तो फाटणार नाही, अशा पद्धतीने बांधला पाहिजे.ध्वजाचा दुरुपयोग थांबविण्यासंदर्भात स्पष्ट दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार राजकीय व्यक्ती, केंद्रीय सैनिक दलाच्या संबंधित व्यक्तीच्या अंत्ययात्रेव्यतिरिक्त इतरत्र कोठेही त्याचा उपयोग करू नये. ध्वज कुठलेही वाहन, रेल्वे, जहाजावर लावला जाऊ शकत नाही.
  • ध्वजाचा उपयोग घराच्या पडद्यासाठी करू नये. कुठलाही पेहराव करताना ध्वजाचे कापड घेता येणार नाही. तसेच राष्ट्रध्वज गादी, रुमाल अथवा नॅपकीनवर काढू नये. राष्ट्रध्वजावर कुठेलीही लिखाण केले जात नाही किंवा त्यावर कुठलीही जाहिरात केली जात नाही. ध्वज ज्या खांबावर फडकविला जातो त्यावरही जाहिरात लावता येणार नाही.
  • केवळ प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्य दिन याच दिवशी ध्वज फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो. राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत. शासकीय पोषाखात असलेले सरकारी अधिकारी ध्वजाला मानवंदना देतील. जेव्हा ध्वज सैन्याच्या तुकडीतील जवानाच्या हातात असेल व तो सावधान स्थितीत उभा राहिल. सरकारी अधिकार्यां च्या जवळून ध्वज जात असताना त्यांनी ध्वजाला सन्मानपूर्वक मानवंदना दिली पाहिजे. आदरणीय व्यक्ती डोक्यावर टोपी न घालताही राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊ शकतात.
(स्त्रोत- विकिपीडिया)

आजचा सुविचार

प्रत्येक सर्वोत्तम गोष्ट स्वत:त लपलेली असते.


आजची बोधकथा


        एका गावात एक कोळी राहत होता. रोज समुद्रात जाऊन मासे पकडायचे आणि बाजारात जाऊन विकायचे हाच त्याचा दिनक्रम होता. पण एके दिवशी काही केल्या त्याच्या जाळ्यात काही मासे सापडेनात. तो हैराण झाला. दुसऱ्या दिवशीही तोच प्रकार झाला. तो कंटाळला. त्याला काही सुचेना. तिसऱ्या दिवशीही हाच प्रकार झाला मग मात्र त्याच्या मनाची घालमेल होवू लागली. मनाशी म्हणाला,''आता जर समुद्रात मासे मिळाले नाहीत तर मी काही समुद्रावर येणार नाही." असे ठरवून त्याने जाळे समुद्रात टाकले. यावेळी त्याच्या नशिबाने त्याला साथ दिली. एक छोटा का होईना मासा त्याच्या जाळ्यात सापडला.
कोळ्याने जाळे वर ओढताच मासाही वर आला व मनुष्यवाणीत बोलू लागला. काकुळतीला येवून तो मासा म्हणाला,'' मी तुझ्या पाया पडतो पण मला सोडून दे. मी आत्ता खूप लहान आहे. मी मोठा होईन तेंव्हा तू मला पकड. मला परत समुद्रात जावू दे". कोळी म्हणाला," अरे मत्स्या ! काय माहित तू मला परत सापडशील कि नाही, आणि आज तुला जर नेले नाही तर मी आणि माझ्यावर अवलंबून असलेले लोक मात्र उपाशी मारतील. तेंव्हा तुला सोडून देण्याचा प्रश्नच येत नाही."

तात्पर्य :


 भविष्यात मोठे घबाड मिळेल या आशेवर आता हाती आलेली संधी सोडणे म्हणजे शुद्ध मूर्खपणा होय.

TODAYS THOUGHT


One evil rises out of another.


TODAYS MORAL STORY


THE FOX AND THE STORK

   
   
 A selfish fox once invited a stork to dinner at his home in a hollow tree. That evening, the stork flew to the fox’s home and knocked on the door with her long beak. The fox
opened the door and said,“Please come in and share my food.”The stork was invited to sit down at the table. She was very hungry and the food smelled delicious! The fox served soup in shallow bowls and he licked up all his soup very quickly. However, the stork could not have any of it as the bowl was too shallow for her long beak. The poor stork just smiled politely and stayed hungry.
     The selfish fox asked, “Stork, why haven’t you taken your soup? Don’t you like it?” The stork replied, “It was very kind of you to invite me for dinner.Tomorrow evening, please join me for dinner at my home.”
     The next day, when the fox arrived at the stork’s home, he saw that they were also having soup for dinner. This time the soup was served in tall jugs. The stork drank the soup easily but the fox could not reach inside the tall jug. This time it was his turn to go hungry.


MORAL


A selfish act can backfire on you.